Join MultiplyOpen a Free ShopSign InHelp
MultiplyLogo
SEARCH

स्वप्नाच्या कवितांचे भावविश्व

प्रस्तावना :१९ तारखेला गुढीपाडवा..साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त.या दिवशी नवीन संवत्सराचा प्रारंभ होतो व नवे पंचागही सुरु होते.शालिवाहन शकाची म्हणजेच हिंदू कालगणनेची सुरुवात याच दिवशी झाली.चैत्र शुध्द प्रतिपदा हा मराठी नवीन वर्षाचा प्रथम दिवस.यामागील कथा अशी की प्रभू श्री रामचंद्र १४ वर्षे वनवास संपवून लंकेच्या रावणाचा वध करुन विजयी होउन ज्या दिवशी आपल्या अयोध्येला परत आले तो दिवस 'चैत्र शुध्द प्रतिपदा'हा होता.अयोध्या नगरीतील लोकांनी घरोघरी गुढ्या,तोरणे उभारुन रामाच्या येण्याचा आनंद व्यक्त केला.म्हणून गुढीपाडवा हा
सण दरवर्षी साजरा केला जातो.
यानिमित्त सर्वांना मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..नवीन वर्ष आपल्या मनोकामना पूर्ण करणारे,आरोग्य आणि यश देणारे असो हीच शुभेच्छा..


** साजरादिन हो गुढीपाडव्याचा **


वसंत ऋतुच्या आगमनी,कोकीळ गाइ मंजूळ गाणी..
नवीन पल्लवी वृक्षलतांची,नवीन आशा नववर्षाची..

उभारुन गुढी..प्रेमाची,विश्वासाची अन विजयाची..
सजवुन मधुर वर्तनाच्या हारकड्यांनी..

मराठी नववर्षाची सुरुवात करुया साजरी..
गुढीपाडव्याच्या मुहूर्ती,सुखसमृध्दी नांदो जीवनी..

आरंभ होई चैत्रमासीचा,रंगगंधांच्या उधळणीचा..
घास घेउनी पुरणपोळीचा,साजरादिन हो गुढीपाडव्याचा..

सरुन जावो दु:खआपदा,नांदो मांगल्य सर्वदा..
ह्याच माझ्या आपल्याला शुभेच्छा..



0 Comments
Add a Comment